वृत्तसंस्था
नांदेड : नांदेडमध्ये कोविड रुग्णालयं फुल्ल झाली असून ऑक्सिजन साठाही संपला आहे. त्यामुळे रुग्णांची उपचारासाठी वणवण सुरु आहे. Kovid Hospital in Nanded is full of patients
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू झालेले आहेत. तसेच वीकेंड लॉकडाऊनही लागू आहे. तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासांत संपणार असल्याची धक्कादायक माहिती डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
शासकीय मेडिकल कॉलेज येथे रुग्णांना परत पाठवलं जात आहे. रुग्णालयात वाढत्या संख्येमुळे बेड नसल्याने रुग्णांना परत पाठवलं जात आहे. शनिवारी (ता. 6 ) पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी 200 बेडच्या जम्बो कोविड सेंटरला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. पण आज ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. बेड अभावी रुग्णांना भटकावे लागत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे.