• Download App
    कतार मधल्या 8 नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना परराष्ट्रमंत्री जयशंकर भेटले; सुटकेचा दिला विश्वास!! jaishankar met familes of the 8 indians detained in Qatar

    कतार मधल्या 8 नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना परराष्ट्रमंत्री जयशंकर भेटले; सुटकेचा दिला विश्वास!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना परराष्ट्रमंत्री जयशंकर आज भेटले आणि त्यांनी च्या अधिकाऱ्यांच्या सुटकेचा विश्वास त्या कुटुंबीयांना दिला. स्वतः जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. jaishankar met familes of the 8 indians detained in Qatar

    कतार मध्ये 8 भारतीय नौदल अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या जाळ्यात अडकविण्यात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा हात असल्याचे आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चा आहे.

    कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरून भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना तिथल्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे सर्व अधिकारी तिथल्या तुरुंगात आहेत. त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत देण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे. तशी कायदेशीर मदत आणि सुरक्षा भारत सरकारने आधी पुरवली. परंतु तरीदेखील कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी केलेली नाही.

    या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांची कुटुंबे अत्यंत चिंतेत आहेत. या चिंताक्रांत कुटुंबीयांची परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भेट घेऊन त्यांना अधिकाऱ्यांच्या सुटकेचा विश्वास दिला. कतार सरकार बरोबर भारत सरकारच्या कायदेशीर पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. 8 नौदल अधिकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कायदेशीर मदत सल्ला मिळवून दिला जाईल, असा विश्वास जयशंकर यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिला.

    भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल हरीकुमार यांनी देखील असाच विश्वास व्यक्त केला. भारतीय नौदल कतार मधल्या अधिकाऱ्यांच्या वकिलांच्या संपर्कात आहे. कतारच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ नये यासाठी कतार नौदलाशी देखील संपर्क साधला आहे, अशी माहिती हरीकुमार यांनी दिली.

    jaishankar met familes of the 8 indians detained in Qatar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा