• Download App
    कोकणसह विदर्भातही येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे | India meteorological department has issued alert of heavy rain in maharashtra's several districts.

    कोकणसह विदर्भातही येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पुढील तीन दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबईमधील प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे.

    India meteorological department has issued alert of heavy rain in maharashtra’s several districts.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे, हा पट्टा पश्चिम ते उत्तर दिशेला सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार असून रविवार, सोमवार आणि मंगळवार या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच दरम्यान कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.


    Maharashtra Heavy Rain : मुंबईसह महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस, चाळीसगाव परिसरात पाणीच पाणी, कन्नड घाटात दरड कोसळली


    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे मुंबईतील तापमान मागील काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मुंबईचा उष्मा वाढला आहे. जास्तीत जास्त ३१.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद मुंबईतील कोलाबा भागात करण्यात आली आहे. तर कमीतकमी २६.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

    India meteorological department has issued alert of heavy rain in maharashtra’s several districts.

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार