मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता पाठपुरावा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आभार मानले आहेत. Increase in income limit for affordable houses in Pradhan Mantri Awas Yojana for economically weaker sections
या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी आर्थिक दुर्बल घटकांसठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडे २१ जून २०२३ रोजी पत्राद्वारे केली होती.
तर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रकाडे विनंती केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.
Increase in income limit for affordable houses in Pradhan Mantri Awas Yojana for economically weaker sections
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त