• Download App
    पंजप्यारेंचा अपमान करणाºया हरिश रावत यांनी घेतले प्रायाश्चित, गुरुद्वारा झाडला, बुटही साफ केले|Harish Rawat, who insulted Panjpyare, took penance, removed Gurudwara, cleaned his shoes

    पंजप्यारेंचा अपमान करणाऱ्या हरिश रावत यांनी घेतले प्रायाश्चित, गुरुद्वारा झाडला, बुटही साफ केले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या चार सल्लागारांना उपमा देऊन कॉँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी पंजप्यारेंचा अपमान केला. त्याचे प्रायाश्चित म्हणून उत्तराखंडमधील एका गुरुद्वारा त्यांनी झाडला. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांची पादत्राणेही साफ केली.Harish Rawat, who insulted Panjpyare, took penance, removed Gurudwara, cleaned his shoes

    पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत उत्तराखंडच्या खटिमाजवळील गुरुद्वारामध्ये फरशी साफ करताना आणि बुट पुसतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. रावत यांनी यापूर्वी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि चार कार्यकारी अध्यक्षांना ‘पाच प्यारे’ म्हणून संबोधले होते.



    शिखांसाठी पंजप्यारे म्हणजे पाच प्यारे अत्यंत पवित्र शब्द आहे.पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यातील वाद मिटविण्यासाठी रावत पंजाबमध्ये आले होते.

    मात्र, स्वत:च वादात सापडले. त्यांनी शिख धर्मातील महान पंजप्यारे अशी उपमा सिध्दू आणि त्यांच्या चार कार्यकारी अध्यक्षांना दिली. त्यामुळे कॉँग्रेससह विरोधी पक्षांनीही टीकेचे मोहोळ उठविले होते.

    रावत यांना आपल्या चुकीची माहिती झाल्यावर त्यांनी ट्विट केले की माझ्याकडून चूक झाली आहे. लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी क्षमा मागतो. सगळ्यांकडून क्षमायाचना करणेच माझे प्रायाश्चित आहे.

    Harish Rawat, who insulted Panjpyare, took penance, removed Gurudwara, cleaned his shoes

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Abujhmad : अबुझमाड चकमकीत 6 नक्षलवादी ठार; सर्व मृतदेह जप्त, स्वयंचलित शस्त्रेही सापडली

    Telugu Actor Fish Venkat : तेलुगू अभिनेता फिश व्यंकट यांचे निधन; किडनीचा होता आजार, मुलीने उपचारासाठी मागितली होती 50 लाखांची आर्थिक मदत

    Jairam : ऑपरेशन सिंदूर: ट्रम्प यांच्या दाव्यांवर काँग्रेसचे 3 प्रश्न; जयराम म्हणाले- आम्हाला संसदेत पंतप्रधानांकडून उत्तर हवे