आणखी एका गंभीर जखमी जवानाला तत्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : पूंछ-जम्मू महामार्गावर गुरुवारी (20 एप्रिल) लष्कराच्या वाहनाला आग लागली. लष्कराने याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. पीआरओ डिफेन्स जम्मू यांनी सांगितले की, पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या ट्रकला लागलेल्या आगीत पाच लष्करी जवानांचा मृत्यू झाला. भाटा धुरियन परिसरात महामार्गावर ही घटना घडली. त्याचवेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती दिली आहे. Grenades lobbed by terrorists possibly led to truck catching fire killing 5 army jawan
लष्कराने सांगितले की, “जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पुंछ दरम्यान जात असलेल्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यामुळे वाहनाला आग लागली.
लष्कराने सांगितले की, “या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या जवानांना या घटनेत आपला जीव गमवावा लागला.” आणखी एका गंभीर जखमी जवानाला तत्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे.” लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी आहेत.
Grenades lobbed by terrorists possibly led to truck catching fire killing 5 army jawan
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या कथित बंडाने काय साधले??; राष्ट्रीय विरोधी ऐक्याचे भीष्मपितामह संशयाच्या जाळ्यात अडकले!!..
- विदेशी निधी प्रकरणी ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध CBIने दाखल केला गुन्हा!
- ‘डझनभर मुलांना जन्म देणाऱ्यांची ही लोकसंख्या आहे’, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची टिप्पणी!
- सचिन पायलट यांची जालंधर पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करत काँग्रेसकडून बोळवण