• Download App
    काँग्रेसच्या वडेट्टीवारांच्या राजकीय प्रचाराला शमीम मुश्रीफांचे बौद्धिक इंधन; पण युपीए सरकारनेच तपासावर का टाकले झाकण?? Former IPS shamim Musharif supported Vijay wadettiwar's allegation over killings of hemant karkare

    काँग्रेसच्या वडेट्टीवारांच्या राजकीय प्रचाराला शमीम मुश्रीफांचे बौद्धिक इंधन; पण युपीए सरकारनेच तपासावर का टाकले झाकण??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या राजकीय प्रचाराला वरिष्ठ पोलीस अधिकारी शमी मुश्रीफांनी बौद्धिक इंधन पुरवले आहे. 2009 मध्ये लिहिलेल्या आपल्या पुस्तकाचा हवाला देऊन त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यात पुन्हा एकदा गुंतविले आहे. Former IPS shamim Musharif supported Vijay wadettiwar’s allegation over killings of hemant karkare

    शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी दहशतवादी कसाबची नव्हती ती संघ समर्थित पोलीस अधिकाऱ्याची होती असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला त्या पाठोपाठ महाराष्ट्रात देशातले राजकीय वातावरण टाकले काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर देखील वडेट्टीवार यांच्या समर्थनासाठी पुढे आले. त्या पाठोपाठ निवृत्त पोलिस अधिकारी शमीम मुश्रीफ यांनी वडेट्टीवारांच्या वक्तव्याला बौद्धिक इंधन पुरविले.

    हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. तर ती गोळी संघ समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल, तर तो उज्ज्वल निकम आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

    वडेट्टीवारांच्या आरोपाचे उज्ज्वल निकम यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन स्पष्टपणे खंडन केले. पण त्या पाठोपाठ विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी शमीम मुश्रीफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करून राजकीय वादाला बौद्धिक इंधन पुरवठा केला.


    उज्ज्वल निकमांना देशद्रोही म्हणणारे विजय वडेट्टीवार अडचणीत; माघार घेताना दिला एस. एम. मुश्रीफांचा हवाला!!


     

    टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत शमीम मुश्रीफ म्हणाले :

    “हू किल्ड करकरे??” हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्याच्या बऱ्याच प्रती निघाल्या. पण नुकतंच उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मला वाटतं आपण यावर काहीतरी निवेदन दिले पाहिजे. कारण ते या सगळ्या प्रकरणात सरकारी वकील होते. त्यांची बरीच जबाबदारी होती. एक सत्य लोकांसमोर आणायची जबाबदारी होती. ते “सत्य” मी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेलं होतं. या पुस्तकात मी मुख्यत्वे दोन मुद्दे मांडले होते.

    – ज्यावेळेस एखाद्याचा बुलेटने मृत्यू होतो त्यावेळेस त्याच्या शरीरातल्या गोळ्या या बॅलेस्टिक एक्सपर्ट म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्टकडे पाठवल्या जातात. ज्या शस्त्रातून बुलेड उडाल्याचा संशय आहे ते शस्त्र पाठवले जातात. ते त्याचं कम्पॅरिसन करतात मग सांगतात की या शस्त्रातून गोळ्या उडवल्या गेल्या की नाहीत. हेमंत करकरे यांच्या शरीरातून ज्या गोळ्या मिळाल्या त्यांचे फॉरेन्सिक विभागाने जे निरीक्षण केले, त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की, हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या. किंवा त्याचा जो इस्माईल नावाचा साथीदार होता त्याच्याही रायफूलमधून उडवलेल्या नव्हत्या, असा स्पष्ट उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला होता.

    – जजमेंटमध्ये म्हणजेच निकालामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्याच निकालपत्रात पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे हेही नमूद करण्यात आलं आहे की, त्यांना ज्या गोळ्या मारण्यात आल्या आहेत त्या मानेपासून पोटात खाली पाच गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. याचा अर्थ पक्का झाला की, त्यांना पाच गोळ्या रिव्हॉलवरने मारल्या. त्यातील तीन बाहेर निघून गेल्या, दोन आतमध्येच राहिल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

    मुश्रीफांचा निकमांवर गंभीर आरोप

    ही बाब उज्ज्वल निकम यांच्या लक्षात आली होती. कारण पोस्टमार्टम रिपोर्ट कागदपत्रात होता. निकालात ही बाब आली होती. उज्ज्वल निकम यांची जबाबदारी होती की, त्यांनी कोर्टाला विनंती करने की, तुम्ही तपास यंत्रणांना आदेश द्या, ज्या गोळ्यांमुळे हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला त्या कुणी मारल्या याचा तपास करणयाचे आदेश द्या, अशी त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी तशी विनंती त्यांनी कोर्टात केलेली नाही. किंवा त्यांनी ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणली नाही. याचा अर्थ त्यांनी जाणूनबुजून या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

    – आमच्या जनरल नॉलेजवरुन प्रभाकर आलोक आणि ज्यांनी वरुन खाली गोळ्या घातल्या ते पोलीस अधिकारी हे दोघेही आरएसएसशी संबंधित आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली. याचा अर्थ उज्ज्वल निकम यांनी आरएसएसच्या दोन लोकांना वाचवण्यासाठी, या सर्व हल्ल्यामागील जबाबदार असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तींना वाचवलं. हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे प्रभाकर आलोक, संजय गोयीलकर वरुन ज्यांनी गोळ्या मारल्या आहेत ते आणि उज्ज्वल निकम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.

    – ज्यावेळी माझं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी बिहारचे आमदार राधाकांत यादव, त्यांचं त्यावेळी वय 77 वर्षे होतं. त्यांनी ते पुस्तक वाचलं. त्यानंतर त्यावेळी ते मला येऊन भेटले. ते म्हटले की, तुम्ही जे म्हणालात ते मला पटलेलं आहे. या गुन्हाचा फेरतपास व्हावा यासाठी जनहित याचिका दाखल करायची आहे. तर मी म्हटलं, ठीक आहे. तुम्हाला जे काही डॉक्यूमेंट्स लागतील ते मी देतो. त्याच्या आधारे त्यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केला. सुरुवातीला ती फक्त रिट पिटीशन होती. पण कोर्टाने स्वत: त्याचं रुपांतर जनहित याचिकेत केलं. ही याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने ते बघितलं आणि हे बरोबर आहे, याच्या बोलण्यात तथ्य आहे, असं बघितलं. कोर्टाला जोपर्यंत तथ्य आहे असं वाटत नाही तोपर्यंत ते नोटीस काढत नाहीत.

    शमीम मुश्रीफ यांनी 2009 च्या पुस्तकातले विविध हवाले देऊन राजकीय वादात मोठा बौद्धिक इंधन पुरवठा केला आहे. त्यामुळे करकरे प्रकरणाचा राजकीय वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. पण 2009 ते 2014 या काळात तर केंद्रात काँग्रेस प्रणित यूपीए सरकार अस्तित्वात होते, मग त्या सरकारने वडेट्टीवार आज जी मागणी करत आहेत, त्या पद्धतीची चौकशी आणि तपास का केला नाही??, असा सवाल तयार झाला आहे.

    Former IPS shamim Musharif supported Vijay wadettiwar’s allegation over killings of hemant karkare

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा