संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी मोठी घोषणा करत भारतीय लष्करासाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित उपग्रहाचा प्रस्ताव आहे. यामुळे लष्कराच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.Defence Ministry clears Indian Army’s Rs 4,000 crore proposal for surveillance satellite to keep eye on China, Pak border
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी मोठी घोषणा करत भारतीय लष्करासाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समर्पित उपग्रहाचा प्रस्ताव आहे. यामुळे लष्कराच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, भारतीय लष्करासाठी समर्पित मेड इन इंडिया उपग्रहाच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागात लष्कराची पाळत ठेवण्याची क्षमता आणखी मजबूत होणार आहे.
सूत्रांनी सांगितले की GSAT 7B उपग्रहाच्या प्रकल्पाचे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या भागीदारीतून केले जाईल. भारतीय वायुसेना आणि नौदलाकडे आधीच समर्पित उपग्रह आहेत आणि या परवानगीनंतर लवकरच सैन्याकडेही हे वैशिष्ट्य असेल.