विशेष प्रतिनिधी
लखनौ: उत्तर प्रदेश सरकारने वाढत्या कोरोनामुळे राज्यात आणखी दोन दिवसांसाठी लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर सुनावणी करताना सध्याचे निर्बंध पुरेसे नसल्याचे म्हटले होते. Corona situation worsen in UP and Rajsthan
राज्यात दीर्घकाळ लॉकडाउन लागू करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता निर्बंध कडक केले आहेत.
राज्य सरकारने मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पहिल्यांदा एक हजाराचा दंड आकारावा आणि दुसऱ्यांदा तोच व्यक्ती विना मास्कचा आढळल्यास दहा पट दंड वसूल करावा, असे म्हटले आहे. कोरोना प्रोटोकालचे काटेकोरपणे पालन करावे, असे सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, राजस्थानातही दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात हाहा:कार माजवलेला असताना आता मे महिन्याची सुरवातही धक्कादायक आहे. काल राज्यात सुमारे १८२९८ रुग्ण नव्याने आढळून आले असून १५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा कहर सर्वाधिक जयपूरमध्ये असून तेथे ४४५६ रुग्ण सापडले आहेत. त्याचवेळी जयपूर जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जोधपूर, उदयपूर शहरातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जोधपूर येथे २२१२ तर उदयपूर येथे १२१२ रुग्ण आढळून आले.
Corona situation worsen in UP and Rajsthan
महत्त्वाच्या बातम्या