वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांची शिक्षा झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले संख्या बळ घटून 5 वरून 4 वर आले आहे. शरद पवारांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. Conviction for attempted murder of Congress leader; NCP’s MP Mohammad Faizal’s candidature cancelled
लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करून 11 जानेवारी 2023 पासून मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. 11 जानेवारी 2023 याच दिवशी कवरत्ती जिल्हा न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्यासह चौघांना काँग्रेसचे नेते पदनाथ सालीह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल 10 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 लाख रुपयांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध मोहम्मद फैजल हे केरळ उच्च न्यायालयात गेले. परंतु त्यांना तेथेही दिलासा मिळाला नाही आणि आता लोकसभा सचिवालयाने संविधान अनुच्छेद 102 (एल) (ई) च्या प्रावधानानुसार जन प्रतिनिधित्व अधिनियम 1951 धारा 8 अनुसार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले आहे. कोणत्याही सदस्याला 2 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली, तर त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार लोकसभा सचिवालयाला याला आहे. तो यात वापरण्यात आला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
संबंधित प्रकरण असे :
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना राजकीय हत्येच्या प्रयत्नाबद्दल 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड कवरत्ती जिल्हा न्यायालयाने ठोठावला. मोहम्मद फैजल यांच्याबरोबर त्यांच्या 4 साथीदारांना देखील तुरुंगवास आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
राजकीय हत्येच्या प्रयत्नाचे संबंधित प्रकरण 2009 मधले आहे. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहम्मद फैजल आणि त्यांच्या 4 साथीदारांनी पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला होता. पदनाथ सालीह हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. एम. सईद यांचे जावई आहेत. पी. एम. सईद हे लक्षद्वीप मधून आठ निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेचे उपसभापतीही होते. त्यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर खासदार मोहम्मद फैजल आणि त्यांच्या 4 साथीदारांनी कवरत्तीजवळ हल्ला केला होता. कवरत्ती जिल्हा न्यायालयात या सर्वांवरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना 10 वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
मासे निर्यात घोटाळ्यातही आरोप
मोहम्मद फैजल यांच्यावर फक्त राजकीय हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा लागलेला नाही, तर 2012 मध्ये श्रीलंकेला टूना मासे निर्यातीत घोटाळा केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. लक्षद्वीपच्या स्थानिक मच्छीमारांनी पकडलेले टूना मासे मोहम्मद फैजल यांनी श्रीलंकेला निर्यात केले. परंतु, स्थानिक मच्छीमारांच्या संस्थेला त्याचे पैसे चुकतेच केले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध 2012 मध्ये आरोपपत्र दाखल केले आहे.
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये ते घड्याळ चिन्हावर लोकसभेत निवडून आले होते. पण आता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Conviction for attempted murder of Congress leader; NCP’s MP Mohammad Faizal’s candidature cancelled
महत्वाच्या बातम्या
- कौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी
- शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील
- 21 पक्षांना पत्र पाठवून काँग्रेस विरोधकांची एकी साधतेय की बेकी??
- जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख चौधरींचे निधन; भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालताना हार्ट अटॅक