• Download App
    Congress काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी

    काँग्रेसच्या सर्व्हेत राष्ट्रीय पक्षांनाच मोठ्या यशाची हमी; ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला, प्रत्यक्षात ते 60 – 60 जागांचे धनी!!

    नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुती वर मात केली. त्यातही काँग्रेस अव्वल कामगिरीसह नंबर 1 चा पक्ष ठरला. त्यामुळे हुरूप वाढलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वेक्षण करून आपली निवडणूक तयारी चालवली आहे. या सर्वेक्षणाचा काही भाग वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांना मिळाला असून त्यांनी तो आपापल्या मगदूरानुसार प्रसिद्ध केला आहे. Congress survey brings dismay for thackeray pawar factors

    या सर्वेक्षणाची नेमकी आकडेवारी बारकाईने पाहिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत लक्षात येतो. महाराष्ट्राचे राजकारण कधीही संकुचित प्रादेशिक राहिले नसल्याचे काँग्रेसच्या देखील सर्वेक्षणातून दिसून येते. कारण सर्वेक्षणातल्याच आकडेवारीनुसार काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांनाच निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 145 पेक्षा जास्त जागा जनतेने दिल्याचे दिसून येते. त्याउलट ठाकरे आणि पवार नावांच्या फॅक्टरचा महाराष्ट्राची मराठी माध्यमे मोठा बोलबाला करून ठेवतात. त्यांचे ढोल वाजवतात, पण प्रत्यक्षात जनमताचा कौल त्यांना 60 – 60 जागांच्या पलीकडे नेत नाही हेच आकडेवारीतून दिसून येते. काँग्रेसला 80 ते 85 तर भाजपला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता काँग्रेसच्या सर्वेक्षणात व्यक्त केली आहे. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या आकड्यांची बेरीज केली, तर ती 140 – 145 च्या आसपास पोहोचते.

    J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत

    – ठाकरे – पवारांचा नुसताच बोलबाला

    त्याचवेळी अख्खा पवार फॅक्टर आणि अख्खा ठाकरे फॅक्टर म्हणजे दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना यांच्या आकड्याची बेरीज केली, तर ती 60 ते 65 च्या आसपासच भरते. याचाच नेमका अर्थ असा की, महाराष्ट्राचा जनमताचा कौल राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांना अधिक मिळतो. त्या तुलनेत प्रादेशिक नेत्यांचा पाठिंबा मात्र दिवसेंदिवस आकुंचित होतो. तसेही अखंड काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांनी आतापर्यंत अनेकदा विधानसभेच्या जागांची शंभरी ओलांडली आहे. ठाकरे किंवा पवारांच्या पक्षांनी अखंड किंवा विभागून तशी शंभरी कधीच ओलांडलेली नाही. 2024 च्या निवडणुकीतही हे दोन्ही फॅक्टर्स शंभरी ओलांडण्याची शक्यता तर दूरच उलट ते अधिक आकुंचित होण्याची शक्यताच आकडेवारीतून दिसते.

    काँग्रेसने महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणात अर्थातच काँग्रेसलाच पहिले स्थान मिळाले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दुसरे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिसरे स्थान मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 80 ते 85, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 55 ते 60 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 30 ते 32 जागा मिळण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात नमूद केला आहे.

    तर महायुतीमध्ये भाजपला तब्बल 50 जागांचा फटका बसून भाजप 60 ते 62 जागांवर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 30 ते 32 जागांवर, तर अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त 10 जागांवर अडकण्याची शक्यता या सर्वेक्षणाने वर्तवली आहे.

    – ठाकरेंच्या शिवसेनेत मारली मेख!!

    अर्थातच महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर येणार हे काँग्रेसच्या सर्वेक्षणात स्पष्ट दाखविले आहे, पण या सर्वेक्षणाची खरी “राजकीय मेख” अशी की, काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तिसरे स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याच्या चंग बांधून बसली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी थेट सोनिया गांधींचे 10 जनपथ गाठले होते. दिल्लीत बसून मोठे लॉबिंग केले होते.

    कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे हाच उद्धव ठाकरेंचा मनसूबा असताना महाविकास आघाडीत जर त्यांचे स्थान पहिले तर सोडाच, दुसरेही उरले नाही आणि ते तिसऱ्यावर घसरले, तर काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का??, हा कळीचा सवाल आहे. काँग्रेसने आपल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ही “राजकीय मेख” मारून महाराष्ट्रातला आपला मार्ग निष्कंटक करण्याचा प्रयत्न केला आहे.

    Congress survey brings dismay for thackeray pawar factors

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा