खंडणीसाठी मुंबईकरांचा विकास कसा थांबला जनता पाहतेय, देवेंद्र फडणवीसांची तुलना कुणी करू नये, असा घणाघात त्यांनी केला आहे.CM lollipops for Mumbaikars to win Thane, Mumbai Municipal Corporation elections; Prasad Lad’s
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवीन वर्षाच्या सुरूवातीलचा मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत 500 चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्याची घोषणा केली आहे.दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे.
प्रसाद लाड म्हणाले की मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ देखावा असून, मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनीही यावर भाष्य केलंय.
पुढे लाड म्हणाले की , 2015 च्या निवडणुकीत हा अजेंडा होता, आत्ता ते राजकीय स्टंट करत आहेत, लोकांना लॉलीपॉप देत आहेत तसेच फडणवीसांनी जे काम केलं सगळ्यांनी पाहिलं आहे.मुख्यमंत्री काय म्हणतात त्याला महत्व नाही.तसेच खंडणीसाठी मुंबईकरांचा विकास कसा थांबला जनता पाहतेय, देवेंद्र फडणवीसांची तुलना कुणी करू नये, असा घणाघात त्यांनी केला आहे.
CM lollipops for Mumbaikars to win Thane, Mumbai Municipal Corporation elections; Prasad Lad’s
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचा प्रयत्न ; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
- साहित्य अकादमी पुरस्कार 2022 : डॉ. किरन गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ पुस्तकासाठी जाहीर
- Indian Army : नववर्षानिमित्त भारताच्या लष्कराने दिल्या देशवासीयांना खास शुभेच्छा, तर पाक सैनिकांसोबत वाटली मिठाई
- अमरावती : जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंना केले आवाहन