विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवलेल्या 15 जागांपैकी फक्त 6 जागांवर यश मिळाले. या यशामध्ये कशामुळे त्रुटी राहिल्या, याचे विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी केले. जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर मुख्यमंत्र्यांनी मान्य केला. CM eknath shinde accepts defeat, assured corrections
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 290 पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीने बाजी मारली. निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. “सर्वप्रथम मी ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखापेक्षा जास्तीच मताधिक्क्य मिळालं आहे. त्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच अभिनंदन करतो. ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच ठाण्यावर प्रेम होतं. जिल्ह्यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकतोय. एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरनन प्रतिसाद दिला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंद म्हणाले.
“ठाण्याचा किल्ला अबाधित ठेवला. ठाणेकरांनी विकासाला मतदान केलं. गेली अनेक वर्ष ठाण्यात झालेली विकासकाम. मी आपल्याला हे सुद्धा सांगेन राज्य सरकारची दोन वर्षातली काम आणि मोदी सरकारच्या 10 वर्षातली विकासकाम याची देखील पोचपावती विजयामध्ये आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा प्रचार झाला, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली. ठाणेकरांनी कार्यक्रम केलेला आहे. नरेश म्हस्के विजयी झाले त्यांच मनापासून अभिनंदन”
‘मोदींना तडीपार करायची भाषा
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष म्हणून सोबत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार बनेल” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. “इंडिया आघाडीला एकाद्वेषाने पछाडलेल होतं. मोदींना तडीपार करायची भाषा करत होते. पण या देशातील जनतेने विकासाला मतदान केलं. तडीपारीची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. यापुढेही आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पराभवाची काय कारण सांगितली?
राज्यात महायुतीचा पराभव का झाला? त्याचही विश्लेषण केलं. “राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. त्यांचा अपप्रचार, गैरसमज दूर करण्यात कमी पडलो. त्यांचा संभ्रम दूर करु. अपप्रचार, गैरसमज दूर करण्यात कमी पडलो, ज्यांनी मतपेटीच राजकारण केलय, त्यांना सांगू इच्छितो हे राजकारण कधी टिकत नाही. त्यांचा खरा चेहरा दिसून येईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले. 15 जागा लढवल्या, पण कमी जागांवर विजय मिळाला, या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, “काही जागा अतिशय कमी मतांनी गेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला उशीर झाला हे देखील कारण असू शकतं. ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करु.
CM eknath shinde accepts defeat, assured corrections
महत्वाच्या बातम्या
- निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
- मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; 10व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन, सुसाईड नोटही सापडली
- नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??
- फडणवीसांच्या निकटवर्ती नेत्याचा ठाकरेंशी संपर्क की माध्यमेच फेक न्यूज देऊन टीआरपी वाढविण्यात दंग??