प्रतिनिधी
मुंबई : हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यांतून दहशतवादी कारवायांना फंडिंग होत असल्याचे पुरावे समोर येत असल्यामुळे, ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ ला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. मुंबई येथील इस्लामिक जिमखाना, मरिन लाईन्स येथे 12 आणि 13 नोव्हेंबर या दिवशी होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करत हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. Cancel International Halal Show India in Mumbai
या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ ची स्थापना केली असून, प्रसंगी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याची सिद्धता देखील समस्त राष्ट्रप्रेमींनी केली आहे.
विरोध करण्याचा निर्धार
गेल्या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून, हिंदू व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्याची सक्ती ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ यांसारख्या संस्थांकडून केली जात आहे. याच हलाल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्लॉसम इंडिया’ या संस्थेने हा ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ आयोजित केला आहे. दादर, घाटकोपर आणि धारावी या ठिकाणी हलाल सक्तीविरोधी कृती समितीने बैठका घेऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन तसेच आंदोलने, भव्य मोर्चा, सोशल मिडियाद्वारे जनप्रबोधन आदी माध्यमांद्वारे या ‘इंटरनॅशनल हलाल शो’ ला जोरदार विरोध करण्याचा निर्धार केला आहे.
कल्याण येथे आंदोलन
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ हलाल सक्तीविरोधी कृती समितीने आंदोलन करुन हा ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात प्रबोधनपर फलक धरुन घोषणाही दिल्या. पोलिस आणि शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असताना, वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय? असा प्रश्न यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आला. तसेच भारतातील 15 % मुसलमान समाजासाठी 80 % हिंदू समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, असेही यावेळी आंदोलनात स्पष्ट करण्यात आले.
Cancel International Halal Show India in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- T-20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये; नेदरलँड विरुद्ध पराभूत दक्षिण आफ्रिका पुन्हा “चोकर”
- मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…
- महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू; नोंदणी फक्त १ रुपयात
- महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा