• Download App
    हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई - अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग। Bullet train to run at Hyderabad, Nagpur Also; ​​In Gujarat for Mumbai-Ahmedabad route work In Progress

    हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्या बरोबरच मुंबई-पुणे-हैद्राबाद, मुंबई-नाशिक-नागपूर  या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल आठ ते दहा महिन्यात सादर होणार आहे. Bullet train to run at Hyderabad, Nagpur Also; ​​In Gujarat for Mumbai-Ahmedabad route work In Progress

    वेगवान रेल्वे प्रवासासाठी व मुंबईसह महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबई ते अहमदाबाद बरोबरच मुंबई ते हैद्राबाद आणि मुंबई ते नागपूर या मार्गावरही बुलेट ट्रेन सुरु करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या आठ ते दहा महिन्यात तो सादर केला जाईल, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडने दिली.
    मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन पुणे मार्गे तर मुंबई ते नागपूर ट्रेन शिर्डी तसेच नाशिकमार्गे जाईल. मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेन या ६५० किलोमीटर मार्गावर विमानाने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी ४ महिने लागणार आहेत. सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील वर्षांत जानेवारी ते मार्च या दरम्यान सादर होणार आहे.



    याच पद्धतीने मुंबई ते नाशिक-नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही सव्‍‌र्हेक्षण सुरु आहे. या वर्षांच्या अखेरीस पूर्ण होईल. ही ट्रेन मुंबई ते नागपूर दरम्यान खापरी वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांशी जोडली जाईल. तर मुंबई-हैदराबाद ही कामशेत, पुणे,बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, हैदराबादशी जोडले जाणार आहे.
    सर्वेक्षणाचे काम रेंगाळले

    गुजरातमध्ये कामाला गती

    मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भूसंपादनाच्या प्रक्रियेत अडकला आहे. महाराष्ट्रात अवघे २४ टक्के पर्यंतच भूसंपान झाल्याने व वांद्रे कुर्ला संकु ल येथे स्थानक उभारणीसाठीही जागा नाही. त्यामुळे काम ठप्प पडले आहे. उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्षात काम मात्र सुरु झालेले नाही.त्या तुलनेत गुजरातमधील ९४ टक्के आणि दिव-दमणमधील १०० टक्के  भूसंपादन झाले असून कामही सुरु झाले आहे.

    Bullet train to run at Hyderabad, Nagpur Also; ​​In Gujarat for Mumbai-Ahmedabad route work In Progress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी