नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.Booster dose will definitely strengthen Modiji’s fight against three-pronged coron – Chandrakant Patil
विशेष प्रतिनिधी
नवी-दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला लसीकरणासंदर्भात संबोधित केलं.यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आणि जास्तीत जास्त मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांनी आज बूस्टर डोसबाबत महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील ट्विट द्वारे म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिला आहे.ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल’, असे पाटील म्हणाले आहेत.
हे आहेत मोदींचे त्रिसूत्र
१) १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार .
२)आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरु होणार .
३) ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बूस्टर डोस दिल्या जाणार आहे.
Booster dose will definitely strengthen Modiji’s fight against three-pronged corona – Chandrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या
- सावरकर – हिंदुत्व – गाय : लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाच्या शिवानंद तिवारींकडून दिग्विजय सिंह यांचे समर्थन!!
- WATCH : पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
- पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला
- बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी