• Download App
    बेंगलुरूमध्ये 301 मशिदी, मंदिरे, चर्चेसना भोंग्या प्रकरणी नोटीसा; "आव्वाज बंदचे" पोलिसांचे आदेश!! Bongs on mosques: Notice in 301 mosques, temples and churches in Bengaluru

    मशिदींवरचे भोंगे : बेंगलुरूमध्ये 301 मशिदी, मंदिरे, चर्चेसना भोंग्या प्रकरणी नोटीसा; “आव्वाज बंदचे” पोलिसांचे आदेश!!

    वृत्तसंस्था

    बेंगलुरू : सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा महाराष्ट्रा बरोबर अन्य राज्यांमध्ये गाजत असताना बेंगलुरू पोलिसांनी 301 मशिदी, मंदिरे, चर्चेस, पब्ज, रेस्टॉरंट्स आणि काही उद्योगांना देखील आवाजाच्या मर्यादा राखणायासंदर्भात नोटीसा जारी केल्या आहेत. Bongs on mosques: Notice in 301 mosques, temples and churches in Bengaluru

    सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी आवाज डेसिबलची मर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादा कोणत्याही स्वरूपात ओलांडल्या तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बेंगलुरू पोलिसांनी या नोटिशीत दिला आहे.

    125 मशिदी, 83 मंदिरे, 22 चर्चेस तसेच 59 हॉटेल रेस्टॉरंट आणि पब तसेच 12 उद्योगांना या नोटिशी दिल्या आहेत. बेंगलूरूच्या मुख्य जामा मशिदीचे इमाम रशिदी यांनी काही मशिदींना नोटीस आल्याचे मान्य केले आहे. तसेच भोंग्यांचा आवाज मर्यादित करण्यासाठी लाऊड स्पीकर वर विशिष्ट इलेक्ट्रॉनिक डिवाइस बसवण्याचे काम सुरू आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. त्याच बरोबर फक्त मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावरच नव्हे, तर मंदिरांच्या भोंग्यांवरील आवाजावर देखील मर्यादा घाला, अशा मागणीची पुस्ती इमाम रशीदी यांनी जोडली आहे.

    राज ठाकरेंच्या भाषणानंतर मुद्दा पेटला

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे यांच्या आवाजावर तीव्र टीका केल्यानंतर हा मुद्दा राजकीय दृष्ट्या तापला. त्याचे पडसाद कर्नाटकातही उमटले. कर्नाटकातील हिंदुत्ववादी संघटनांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर बंगळुरू पोलिसांनी मशिदी, मंदिरे, चर्चेस यांना आवाज मर्यादित ठेवण्याची नोटीस पाठवली आहे.

    Bongs on mosques: Notice in 301 mosques, temples and churches in Bengaluru

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा