वृत्तसंस्था
सांगली : बड्या, बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा, अशी गत वडेट्टीवारांची झाली आहे, अशी टीका भाजपचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून वडेट्टीवार मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला. ओबीसी व भटके विद्यार्थ्यांचा कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हसं या प्रस्थापितांच्या सरकारने करून ठेवले आहे, असे म्हणाले.
वडेट्टीवार यांना ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याच दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा त्यांचे धोरण राहिलेलं आहे, असे सांगताना ते म्हणाले, MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परिक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना संस्था स्पष्टपणे नकार देते. मात्र, दुसरीकडे सारथी व बार्टी संस्था विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देते.विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजारांचा निधी मिळतो. महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे.
सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केलं तर तीन दिवसात निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत. म्हणजे महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? हे वडेट्टीवारांनी स्पष्ट करावं. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?
– बड्या, बड्या बाता ; ‘धोरण’ खातंय लाथा
– गोपीचंद पडळकर यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका
– महाज्योती संस्थेकडून निर्वाह भत्ता, विद्यावेतन नाही
– प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?
– सारथी- बार्टीकडून १० ते १५ हजारांची मात्र मदत