विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kapil Sibal राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी निमित्त केलेल्या भाषणाची छद्म स्तुती करून काँग्रेसचे नेते आणि दहशतवाद्यांचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी मोहन भागवत यांना काही “सिलेक्टीव्ह” सवाल केले. तुमच्या भाषणातले सामाजिक सौहार्दाचे सगळे मुद्दे ठीक आहेत. पण पंतप्रधान मोदी तुमचं ऐकतात का??, असा सवाल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारला.Kapil Sibal
मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या भाषणात देशात सौहार्द नांदावे. सर्वधर्मीयांनी एकत्रितपणे येऊन आपापले सण साजरे करावेत. देशात भेदाभेद – जातीभेद कुठल्याच आधारावर नकोत. देश एकदिलाने पुढे जावा असे विचार मांडले, त्याबद्दल कपिल सिब्बल यांनी मोहन भागवतांच्या भाषणाची छद्म स्तुती केली. मोहन भागवतांचे विचार आदरणीयच आहेत. देशाच्या ऐक्य आणि एकात्मतेसाठी उपयुक्तच आहेत. पण मला मोहन भागवतांना एक प्रश्न विचारायचा आहे, मोदी तुमचं ऐकतात का?? कारण मोदी सरकार देशातल्या नागरिकांचे नागरिकत्व हिरावून घेणारे कायदे करते. वेगवेगळी भाजपची सरकारी लव्ह जिहाद विरोधात कायदे करतात. तरुण-तरुणींना प्रेमापासून तोडतात. त्यावेळी संघ आणि संघ स्वयंसेवक भाजप बरोबरच असतात. प्रत्येक निवडणुकीत संघ स्वयंसेवक भाजपचेच काम करताना दिसतात. भाजपचे अनेक मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांच्या विरोधात बोलतात. त्यामुळे मला प्रश्न पडतो मोदी तुमचं ऐकतात का??, असा खोचक सवाल कपिल सिब्बल यांनी केला.
पण मोहन भागवत यांनी बांगलादेशात हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत आवाज उठविला. सरकारला बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेवर उपाययोजना करण्याची सूचना केली. देशातल्या दहशतवादी घटनांबद्दल चिंता व्यक्त करून त्या कठोरपणे मोडायचा आग्रह धरला, या विषयांवर मात्र कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत चकार शब्द काढला नाही.
Bhagwat ji, does Modi listen to you??; Kapil Sibal’s “selective” question!
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui : मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या; 2 आरोपींना अटक, लॉरेन्स टोळीचा हात असल्याचा संशय
- Baba Siddiqui : NCP अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या; फेब्रुवारीत कॉंग्रेस सोडून NCPमध्ये केला होता प्रवेश
- Eknath shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी!!
- Reserve Bank of India : देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 8 आठवड्यांत पहिल्यांदाच घट; 701 अब्ज डॉलरवर, गत आठवड्यात विक्रमी उच्चांक