• Download App
    जम्मूच्या रियासीमध्ये हल्ला:वैष्णोदेवीकडे निघालेल्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार; 10 भाविक ठार Attack in Jammu's Reasi: Terrorists open fire on a bus bound for Vaishno Devi; 10 devotees killed

    जम्मूच्या रियासीमध्ये हल्ला:वैष्णोदेवीकडे निघालेल्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार; 10 भाविक ठार

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मिरात यशस्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने दहशतवाद्यांनी रविवारी पंतप्रधान मोदींच्या शपथविधीपूर्वी सायंकाळी सव्वासहा वाजता वैष्णोदेवीला निघालेल्या भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. चालकाच्या दिशेने गोळीबार केल्याने बस दरीत कोसळली. त्यानंतर भाविकांनाही गोळ्या घातल्या. यात 10 भाविक ठार, तर 33 जखमी झाले. बसमध्ये बहुतांश भाविक उत्तर प्रदेशचे होते,अशी माहिती रियासीच्या एसएसपी मोहिता शर्मा यांनी दिली. Attack in Jammu’s Reasi: Terrorists open fire on a bus bound for Vaishno Devi; 10 devotees killed

    37 दिवसांत तिसरा हल्ला

    18 मे रोजी शोपियांची हिरपोरामध्ये रात्री 10.30 वाजता स्थानिक भाजप नेते एजाज अहमद शेख यांची गोळ्या झाडून हत्या केली. 4 मे रोजी पूंछमध्ये हवाई दलाच्या जवानांवर हल्ला. एक जवान शहीद, 7 जखमी झाले.17 एप्रिल रोजी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे बिहारचा रहिवासी शंकरवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

    हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही : अमित शहा

    जम्मूच्या शिवखोडी मंदिराहून कटराकडे निघालेल्या बसच्या चालक व टायरवर दहशतवद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.भाविकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून बसवर अंदाधुंद गोळीबार करून भाविकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काश्मिरातील हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ल्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा व पोलिस महासंचालक आर. आर. स्वेन यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. दरम्यान, हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला. यामुळे काश्मीरचे खरे चित्र समोर आले असून सुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

    Attack in Jammu’s Reasi: Terrorists open fire on a bus bound for Vaishno Devi; 10 devotees killed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा