• Download App
    सिल्वर ओक वरील दगड - चप्पल फेकीची जबाबदारी भाजपवर टाकणारे अल्पबुद्धीचे; फडणवीसांचा राऊतांना टोला   Angry ST workers throw stones at Sharad Pawar's residence Silver Oak

    सिल्वर ओक वरील दगड – चप्पल फेकीची जबाबदारी भाजपवर टाकणारे अल्पबुद्धीचे; फडणवीसांचा राऊतांना टोला  

    प्रतिनिधी

    मुंबई : संतप्त एसटी कामगारांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक वर दगडफेक अँड चप्पल फेक केली त्याची जबाबदारी भाजपवर टाकणाऱ्या संजय राऊत यांची संभावना देवेंद्र फडणवीसांनी अल्प बुद्धीचे अशी केली आहे.Angry ST workers throw stones at Sharad Pawar’s residence Silver Oak

    सिल्वर ओक परिसरात संतप्त एसटी कामगारांनी दगडफेक आणि चप्पल फेक केली. हा हल्ला असून त्या हल्ल्याला भाजप जबाबदार आहे, असा आरोप सर्वात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता, त्यावर भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचे नाव न घेता “अल्प बुद्धीचे” असा टोला हाणला.

    आम्ही आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो. सातत्याने त्यांची मागणी लावून धरली होती. पण सरकारने आडमुठी भूमिका घेतली. ५ महिने हा संप चिघळवत ठेवला. कर्मचाऱ्यांचा हा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय. पण शरद पवारांच्या घरी घडलेली घटना चुकीची होती. तिचा आम्ही निषेधच करतो, या हल्ल्यामागे भाजपला जबाबदार धरणारे अल्पबुद्धीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

    हनुमान चालीसावर राग का येतो? 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यानंतर खुद्द मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतल्यानंतर देखील मनसे कार्यकर्त्यांनी जोरकसपणे या भूमिकेचे समर्थन केले आहे. यासंदर्भात कोल्हापुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसानेही राग यायला नको, असे फडणवीस म्हणाले.

    शिवसेना छद्मधर्मनिरपेक्षवादी 

    शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याच्या मुद्द्यावरून देखील देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. ज्या वेळी शिवसेनेनच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असे नाव छापले, त्यावेळी हिंदूत्ववादी असलेली शिवसेना ही छद्मधर्मनिरपेक्षवादी झाली. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण लांगुलचालनाला आमचा विरोध आहे. शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील, तर हे प्रश्न निर्माण होणारच, असे फडणवीस म्हणाले.

    Angry ST workers throw stones at Sharad Pawar’s residence Silver Oak

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Caste Census : जात जनगणना विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही