• Download App
    आमदार सोडून जातील; अजितदादांनी घातली भीती, की शिंदे - फडणवीसांना थेट सांगितली राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी?? Ajit Pawar claims many MLAs will leave BJP - shinde faction if they fail to make them ministers, but is it a new NCP strategy to hit shinde - Fadanavis government??

    आमदार सोडून जातील; अजितदादांनी घातली भीती, की शिंदे – फडणवीसांना थेट सांगितली राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कसबा पोटनिवडणुकीतल्या निकालाचा विजय बाकी सर्व पोटनिवडणुकांपेक्षा मराठी माध्यमांमध्ये वाढवून ठेवून शरद पवारांनी महाराष्ट्रात जो विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केला आहे, त्याचाच पुढचा भाग म्हणून शिंदे – फडणवीस सरकार आतून अस्थिर आहे, असे भासविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू झाला आहे. Ajit Pawar claims many MLAs will leave BJP – shinde faction if they fail to make them ministers, but is it a new NCP strategy to hit shinde – Fadanavis government??

    विरोधी पक्षनेते अजितदादा पवार गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजप आणि शिंदे गट यांना त्यांचे आमदार सोडून जाण्याची भीती घालत आहेत. भाजपा मधले सध्याचे 40 – 50 आमदार हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतूनच तिकडे गेले होते. ते भाजपच्या तिकिटावर सध्या निवडून आले असले तरी, ते केव्हाही घरवापसी करू शकतात, असे अजितदादा गेले दोन-तीन दिवस म्हणत आहेत.

    शिंदे – फडणवीस सरकार स्थिर होत असताना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित असताना अजितदादांसारख्या चाणाक्ष विरोधी पक्ष नेत्याने सत्ताधारी गोटातले आमदार सोडून जातील, असे वक्तव्य करणे यात राजकीय चतुराई निश्चित आहे!!, पण ती तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे का?? की घरवापसी करणाऱ्या आमदारांना सत्तेचा वाटा देण्याची राष्ट्रवादीची काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे??, हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत.

    … की शिंदे फडणवीसांना अजितदादा हे आमदार सोडून जाण्याची भीती घालून राष्ट्रवादीची पुढची स्ट्रॅटेजीच थेटपणे सांगून सावधानतेचा इशारा देत आहेत??, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

    शरद पवारांची स्ट्रॅटेजी

    2019 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची नेमकी आकडेवारी हेरून उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षा फुलवली आणि त्यांना भाजपपासून बाजूला काढून मुख्यमंत्री केले. त्यावेळी शरद पवारांनी तोपर्यंत कधीच न वापरलेली स्ट्रॅटेजी वापरली होती. निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागो, आकडे काय यायचे ते येवोत, निवडून आलेल्या आमदारांचे बहुमत तयार करून लोकशाही एस्टॅब्लिश करायची ही शरद पवारांची स्ट्रॅटेजी होती. ती अडीच वर्षांसाठी त्यांनी यशस्वी करून दाखवली. पण नंतर हीच स्ट्रॅटेजी अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर उलटवून दाखवली.

    मग आता शरद पवार हे त्यांची पुढची स्ट्रॅटेजी वापरून पाहत आहेत का?? काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन आमदार झालेल्या नेत्यांची पुन्हा घरवापसी करण्याची शरद पवारांची स्ट्रॅटजी आहे का?? आणि शिंदे – फडणवीसांना आमदार सोडून जाण्याची भीती घालून अजितदादा हे शरद पवारांचीच स्ट्रॅटेजीच उघड करून सांगत आहेत का??, हा कळीचा प्रश्न आहे!!

    अमित शाह नुसते बसून राहतील का

    जर खरंच तसे असेल तर शिंदे – फडणवीस आणि वरती अमित शाह हे हातावर हात ठेवून गप्प बसून राहतील का?? त्याचबरोबर घरवापसीसाठी संबंधित 40 – 50 आमदारांना देण्यासारखे राष्ट्रवादीकडे नेमके काय शिल्लक आहे??, या प्रश्नांना काही महत्त्व नाही का??

    राष्ट्रवादीचे स्वबळ नेहमीच तोकडे

    राष्ट्रवादीचे विद्यमान 54 आमदार आणि घरवापसीची शक्यता असलेले राष्ट्रवादीतून भाजप गेलेले 20 – 25 आमदार यांची बेरीज 70 – 75 च्या पुढे जात नाही. म्हणजे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद त्या स्थितीत देखील 2004 सारखीच महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणजे फक्त 72 आमदार निवडून आणणारा पक्ष अशीच होऊ शकते. आमदारांनी घरवापसी केली, तरी राष्ट्रवादी स्वबळावर 100 चा आकडा गाठू शकणार नाही.

    मग आमदारांच्या या तथाकथित घरवापसीतून राष्ट्रवादी नेमके साध्य काय करू शकणार??, आणि अजितदादांना त्यातून काय मिळणार??, हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे!!

    Ajit Pawar claims many MLAs will leave BJP – shinde faction if they fail to make them ministers, but is it a new NCP strategy to hit shinde – Fadanavis government??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा