वृत्तसंस्था
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील विमानतळावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. याच दरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला.After the shooting outside Kabul airport 7 killed in stampede
तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनता देशाबाहेर पडण्यासाठी पळापळ करत आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाकडे पळत आहेत. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
`’काबूल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. “अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे.” असं ब्रिटीश लष्कराने सांगितलं आहे.
तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करत आहेत. काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घातलं आहे. परंतु काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकत आहेत.काही मुले कुंपणांमध्येच अडकून पडली आहेत. सैनिकांनी मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही मुलं तारांमध्येच अडकून पडल्याचं म्हटलं आहे.
After the shooting outside Kabul airport 7 killed in stampede