rafale jet | फ्रान्सकडून भारतीय हवाईदलाला आणखी तीन राफेल विमानं मिळाली आहेत, त्यामुळं भारतीय हवाईदलाच्या शक्तीमध्ये आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 31 मार्च रोजी रात्री उशिरा ही तीन राफेल विमानं गुजरातमधील भारतीय हवाईदलाच्या जामनगर बेसवर पोहोचली. फ्रान्सहून निघालेली ही तीन राफेल विमानं थेट जामनगरमध्ये लँड झाली. यूएईच्या मदतीने या विमानांमध्ये एअर टू एअर रि-फ्युलिंग करण्यात आलं. त्यामुळं भारतीय हवाई दलात समावेश झालेल्या एकूण राफेल विमानंची संख्या ही आता 14 वर पोहोतलवी आहे. यापूर्वी तीन टप्प्यांमध्ये 11 राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. तसंच एप्रिल महिन्यात आणखी 7 विमानं या ताफ्यात दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 3 rafeal jets land in india, now total number is 14
हेही वाचा..
- सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, केंद्राकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे
- BIG BREAKING : रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन ; अनेकांना आश्चर्याचा धक्का
- अखेर पाकिस्तानला झाली उपरती, भारतातून आयात करणार कापूस आणि साखर, पाक अर्थमंत्र्यांची घोषणा
- पुन्हा एकदा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान खासदार इंम्तियाज जलील ‘आमने-सामने’
- WB-Assam 2nd Phase Voting : बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांवर मतदान सुरू, पीएम मोदींचे विक्रमी मतदानाचे आवाहन