वृत्तसंस्था
इंफाळ : Manipur मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी 11 कुकी दहशतवाद्यांना ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम सीमेवर संशयित कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.Manipur
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकी अतिरेक्यांनी दुपारी अडीच वाजता बोरोबेकेरा येथील जाकुराडोर करोंग येथील पोलिस ठाण्यावर हल्ला केला. यानंतर त्यांची येथे उपस्थित सीआरपीएफ जवानांशी चकमक झाली.
सूत्रांनी सांगितले की, मणिपूर हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी पोलिस स्टेशनजवळ एक मदत शिबिर आहे. रिलीफ कॅम्पमध्ये राहणारे लोक कुकी अतिरेक्यांच्या लक्ष्यावर होते. याआधीही येथे अनेकदा हल्ले झाले आहेत. यानंतर सीआरपीएफची टीम येथे तैनात करण्यात आली.
दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते
सूत्रांनी सांगितले की, अतिरेक्यांनी सैनिकांसारखा गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह बोरोबेकरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. संशयित कुकी अतिरेक्यांनी आज सकाळी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील डोंगरांवरून गोळीबार केला. यामध्ये एक शेतकरी जखमी झाला.
5 जणांच्या अपहरणाचा संशय
सूत्रांनी सांगितले की, पोलिस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर अतिरेक्यांनी पोलिस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जाकुराडोर करोंग येथील एका छोट्या वस्तीकडे धाव घेतली आणि घरांना आग लावण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या कालावधीत 5 जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचा दावा केला जात आहे.
इंम्फाळमध्ये शेतकऱ्याची हत्या
सोमवारीच मणिपूरच्या यानगांगपोकपी शांतीखोंगबान भागात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर अतिरेक्यांनी डोंगरावरून गोळीबार केला. यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याशिवाय अनेक शेतकरी जखमी झाले.
पोलिसांनी सांगितले की, या भागातील अतिरेकी सलग तीन दिवस डोंगरापासून खालच्या भागात गोळीबार करत आहेत. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना टार्गेट केले जात आहे. कारण येथे भात पिकाची कापणी सुरू आहे. हल्ल्यांमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.
11 terrorists killed in Manipur, went to attack CRPF outpost; 2 soldiers injured
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक ; अवघ्या 10 लाख रुपयांसाठी खून
- Jagannath Chattopadhyay बंगालमध्ये ४२ वर्षांची सत्ता असूनही काँग्रेसचे नाव मिटले गेले – जगन्नाथ चट्टोपाध्याय
- BJP Manifesto भाजपचा जाहीरनामा- शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या; महिलांना दरमहा 2100 रुपये देणार
- Bangladesh बांगलादेशात ट्रम्प यांचा विजय साजरा करणे समर्थकांना महागात पडले!