West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार म्हणाले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करत आहेत. राज्यात हिंदूंच्या हत्या होत आहेत. लोकांना बांगलादेशातील परिस्थिती माहित आहे. बॅनर्जी यांनी आधीच पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले आहे.