Mamata Banerjee : भाजपची सरकारे असलेल्या राज्यांत बंगाली लोकांच्या छळाविरुद्ध मोर्चा; बंगालींचा छळ अमान्य- ममता
भाजपशासित राज्यांत बंगाली भाषिक लोकांचा छळ होत आहे. त्याच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी जोरदार मोर्चा काढला. कोलकाता येथे मोर्चाला त्यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, बंगाली समाजाविषयी भाजपचे वर्तन पाहून मला लाज वाटते आणि निराशाही वाटली. मी आता जास्त बांगला बोलण्याचे ठरवले. हिंमत असल्यास मलाही डिटेन्शन सेंटरमध्ये टाकावे, असे आव्हान त्यांनी दिले.