Bihar SIR : बिहारमध्ये SIR वर तूर्त बंदी नाही; SCने ECला विचारले- आधार कार्ड व मतदार ओळखपत्र का समाविष्ट करत नाही?
बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) बाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने SIR ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासोबतच, निवडणूक आयोगाला विचारण्यात आले आहे की – मतदार ओळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड का स्वीकारले जात नाही.