Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला, दोषमुक्ती अर्जावर 10 सप्टेंबरला सुनावणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयाने फेटाळला. वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून, त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.