United States : अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भीषण गोळीबार!
अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (FSU) मध्ये गुरुवारी झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. ऑर्लँडोस्थित वृत्तवाहिनी WFTV9 ने सूत्रांच्या हवाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.