• Download App
    अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ |In the United States, citizens of Indian descent suffer greatly, and abusive behavior increases

    अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेत बऱ्याच वेळा अवमानास्पद वागणूक मिळत, असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. या ऑनलाइन सर्वेक्षणात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या जवळपास १२०० भारतीय वंशाच्या नागरिकांना त्यांची मते विचारण्यात आली होती. In the United States, citizens of Indian descent suffer greatly, and abusive behavior increases

    या बाराशे जणांपैकी जवळपास निम्म्या जणांना कधी ना कधी त्यांच्या वंशावरून अवमानास्पद वागणूक मिळाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.‘सोशल रिॲलिटिज्‌ ऑफ इंडियन अमेरिकन्स’ या अहवालामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.



    विशेष म्हणजे, अमेरिकेतच जन्माला आलेल्या नागरिकांनाही या वंशभेदाला सामोरे जावे लागत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांमध्ये, दर दहा जणांमागे आठ जणांनी भारतीय वंशाच्याच व्यक्तीशी विवाह केला आहे. तर, यापैकीही चार जणांनी अमेरिकेतच जन्माला आलेल्या व्यक्तीला जोडीदार म्हणून निवडले आहे.

    या भारतीयांच्या आयुष्यात धर्माची भूमिका महत्त्वाची असली तरी धार्मिक प्रथांचे पालन फारसे होताना दिसत नाही. सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्यांपैकी ४७ टक्के जण रोज प्रार्थना करतात, तर २७ टक्के जण आठवड्यातून किमान एकदा प्रार्थनास्थळाला भेट देतात.

    In the United States, citizens of Indian descent suffer greatly, and abusive behavior increases

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : अमेरिकेतून 18 हजार भारतीय डिपोर्ट होणार; अपील करण्याचीही संधी नाही; ट्रम्प सरकारने 2025 मध्ये भारतीयांना बेड्या घालून पाठवले होते

    Pakistan Plans : गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान; विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

    Mexico : मेक्सिकोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका वाढला; 10 लाख लोकांसाठी अलर्ट जारी, शेजारील देशांमध्येही धक्के जाणवले