Ujjwal Nikam : लोहगड हत्या प्रकरण; खटला जलदगती न्यायालयात चालणार; अॅड. उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया चेतनच्या अडचणीत वाढ
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्याच्या लोहगड हत्या प्रकरणाने पुरुषांवरील अत्याचाराची एक अतिशय गंभीर बाजू समाजासमोर आणली आहे. स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला (केतन अग्रवाल) आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्दयीपणे संपवल्याचा धक्कादायक प्रकार यात उघडकीस आला आहे. या भीषण गुन्ह्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.