Supreme Court : ‘मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शनाबाबत सूचना देण्याचा आमचा अधिकार नाही’
मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क आकारणे आणि विशिष्ट वर्गाच्या लोकांना प्राधान्य देणे याविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा आमच्या अधिकारक्षेत्रातील विषय नाही. हा मुद्दा मंदिर व्यवस्थापन आणि समाजाच्या निर्णयाशी संबंधित आहे