Islamabad : इस्लामाबाद स्फोट भारताने घडवून आणल्याचा शाहबाज शरीफ यांचा आरोप; 12 जणांचा मृत्यू, 36 जखमी; हल्लेखोराने स्वतःला उडवले
मंगळवारी इस्लामाबाद येथील न्यायालयात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला जबाबदार धरले. त्यांनी दावा केला की, हा हल्ला आणि अफगाण सीमेजवळील कॅडेट कॉलेजवरील हल्ला दोन्ही भारत पुरस्कृत दहशतवादी घटना आहेत.