Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- संघाइतका विरोध कोणत्याही संघटनेला झाला नाही, तरीही स्वयंसेवकांच्या मनात समाजाबद्दल प्रेम, म्हणून विरोधाची धार कमी झाली!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले की- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाइतका विरोध इतर कोणत्याही संघटनेला झालेला नाही. असे असूनही, स्वयंसेवकांना समाजाबद्दल शुद्ध सात्विक प्रेम आहे. या प्रेमामुळे आता आमच्या विरोधाची तीव्रता कमी झाली आहे.