Shivraj : शिवराज म्हणाले- देशात एकाच वेळी निवडणुका गरजेच्या, मोदी लोकप्रिय म्हणून विरोधकांना याची भीती!
वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे अनेक निर्णयांवर परिणाम होत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. प्रशासनावर परिणाम होतो, विकास थांबतो आणि पैसा वाया जातो. बऱ्याचदा मते मिळविण्यासाठीही निर्णय घ्यावे लागतात. भोपाळमधील एका खाजगी महाविद्यालयात आयोजित ‘एक देश-एक निवडणूक’ कार्यक्रमात शिवराज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.