Shashi Tharoor : शशी थरूर यांनी असीम मुनीर अन् ट्रम्प यांच्या ‘लंच’वरून लगावला टोला
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या ‘डिनर’वर निशाणा साधला. ट्रम्प यांच्यासोबत जेवताना मुनीर यांना “फूड फॉर थॉट” मिळाले असले, अशी आशा थरूर यांनी व्यक्त केली आहे.