माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!!
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काकांनी साधला डाव, मुलगी ठेवून safe अजितदादांच्याच पुतण्याला धोबीपछाड!! असे राजकारण शरद पवारांनी खेळले.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत ठाकरे बंधू अजून एकत्र येईनात, तोच शरद पवारांनी घातला त्यांच्यात महाविकास आघाडीचा खोडा!!, असे आज बारामतीतून घडले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा महाराष्ट्राच्या राज्याचे वातावरणात रंगत असतानाच शरद पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे, काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे वक्तव्य शरद पवारांनी बारामतीत केले.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.
दोन राष्ट्रवादींची होईचना एकी??, म्हणून शरद पवारांची तिसऱ्यांदा पलटी!!, असे चित्र आज पिंपरी चिंचवड मधून समोर आले. सध्याच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस केव्हाही एकत्र येऊ शकतात
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सुटली “नवी राजकीय पुडी”; भाजपचे मित्र पक्ष फोडायला शिंदे आणि अजितदादांच्या हातात घालणार युतीची नवी बेडी!!, असला प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आता समोर आलाय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अचानक शरद पवारांना बांगलादेशच्या नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याच्या विषयी कळवळा आला. त्या कळवळ्यातूनच पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला चढाविला.
ऑपरेशन सिंदूरवरील राजकारण थांबता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही. ही एक अतिशय संवेदनशील बाब आहे आणि त्यावर खुली चर्चा शक्य नाही. विरोधकांची अशी मागणी योग्य नाही.
मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकां जवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या अपघातामागचे कारण आणि त्यावरील उपाय योजना देखील त्यांनी सुचवल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन 6 महिने उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी त्यावर मॅच फिक्सिंगचा लेख लिहिला. तो देशभरातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आज छापून आला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकच्या कुरापतींविरोधात विविध देशांत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पक्षीय राजकारण करण्याची काहीही गरज नसल्याचे ठणकावून सांगत संजय राऊतांना खडेबोल सुनावलेत.
“बाल वाङ्मयाच्या” प्रकाशनात शरद पवारांची राजकीय फटकेबाजी; PMLA कायदा रद्द करून भ्रष्टाचारी नेत्यांच्या बचावाची तयारी!!, असा प्रसंग काल मुंबईत घडला.
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का?
शरद पवार महायुतीसोबत असते तर आज राष्ट्रपती झाले असते. आताही त्यांचे स्वागतच आहे, असे महत्वपूर्ण विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे बोलताना केले. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी विधान केल्यामुळे त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.
देशात सगळीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरची आणि भारत – पाकिस्तान यांच्यातल्या तणावाची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “चव्हाण + रेड्डी काँग्रेस” करून टाकली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर व्ही. एस. रामचंद्रन यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी राष्ट्रवादी […]
पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने शेती क्रांती करत पिकवलेल्या एका आंब्याच्या जातीला शरद पवारांचे नाव दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे पाकिस्तानला धडा शिकवायच्या बेतात आलेत, पण शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मोदींच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना “मार्गदर्शन” करण्याऐवजी दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलातच अडकलेत!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून गौरविलेले ज्येष्ठ नेते जुन्या खोट्या भांडवलावर अजून किती दिवस राजकीय पोट भरणार
पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.
पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.
राज ठाकरेंनी विचारलेल्या राज की उद्धव??, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिले होते “ठाकरे कुटुंबीय”, पण आता जेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी मात्र पवारांनी कानावर हात ठेवले.
शरद पवारांची अघोषित निवृत्ती, महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांना कत्ती; छोट्या मोठ्या कामांवर दृष्टी!! असे शरद पवारांच्या गेल्या काही आठवड्या मधल्या राजकीय कृतींवरून समोर आलेय.