“पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड; पवारांच्या कोलांट उड्यांचे अदानींच्या डोक्यावर खापर!!; पण किती खरे, किती खोटे??
शरद पवारांच्या कोलांट उड्यांचे गौतम अदानींच्या डोक्यावर खापर; “पवार बुद्धीच्या” पत्रकारांची फुल टू रडारड!!, हेच राजकीय चित्र या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दिसले. शरद पवार गौतम अदानींना फक्त 25 कोटी रुपयांमध्ये “पटले”, हे काही पवार बुद्धीच्या पत्रकारांना पटले नाही. गौतम अदानींनी पवारांच्या विद्या प्रतिष्ठानला 25 कोटी रुपयांची देणगी दिली. त्या देणगीतून “शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स” उभे राहिले आणि त्याच्या उद्घाटनाला पवारांनी गौतम अदानींना बोलावले.