Sanjay Raut : राऊत-पवारांची भूमिका केवळ संकुचितपणा आणि राजकीय द्वेष; भाजपाची टीका
सध्या देशभरात नवीन उपराष्ट्रपती नेमकं कोण होणार यावर सतत काही ना काही चर्चा चालू आहे. एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले, तर इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. पवार आणि ठाकरे गट हे नक्षल कनेक्शन असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार का? असा सवाल भाजपाने केला होता. त्यावर शरद पवारांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.