S. Jaishankar : संयुक्त राष्ट्रात एस. जयशंकर यांचा पाकिस्तानवर प्रहार, अमेरिका–चीनलाही सुनावले
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान ठरवत त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, “भारताने स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना केला आहे. आमचा शेजारी देश आजही जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे.”