RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले- भाजप आणि संघ यांच्यात कोणताही वाद नाही. आमचे फक्त भाजप सरकारशीच नाही, तर सर्व सरकारांशी चांगले संबंध आहेत.सरकारमध्ये निर्णय घेण्याच्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, सरकारमध्ये सर्व काही संघ ठरवतो असे म्हणणे चुकीचे आहे. आपण सल्ला देऊ शकतो, पण निर्णय ते घेतात. जर आपण निर्णय घेतला असता तर इतका वेळ लागला नसता.