रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाचा दणका; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती, मतदार यादी मध्ये नातेवाईक घुसविणे भोवले!!
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.