शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांचा राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी!!
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
शरद पवारांचा राजकीय वारस ठरणे दूरच; अजितदादांच्याच राजकीय वारसा चालविण्यात राजकीय घुसखोरी करायचा प्रकार समोर आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा आणि विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!, असलाच प्रकार रोहित पवारांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून समोर आला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास संघटनेत मोठे बदल होतील, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या मते, दिवंगत नेते अजित पवार यांना नेतृत्वात फेरबदल करायचे होते आणि प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा द्यायचा होता. त्यासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा झाली होती. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या दाव्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर रोहित पवार ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेत आहेत किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदा घ्यायला लावले जात आहे, ते पाहता रोहित पवारांचा “राहुल गांधी” आणि “संजय राऊत” करून सुप्रिया सुळे नामानिराळ्या झाल्यात आणि शरद पवार सुद्धा “सुरक्षित” राहिलेत, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या मनानुसार आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, असे लक्षात येताच रोहित पवारांनी आपले सगळे लक्ष अजित पवारांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रित केले.
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार रोहित पवारांनी आज पुढच्या टप्प्यात जाऊन तेलगू देशम पार्टी आणि भाजपला सुद्धा संशयाच्या जाळ्यात ओढले. यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन केले आणि आरोप आणि दाव्यांच्या फैरी झाडल्या.
नरेश अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायलाच हवा, अशी काहींची भूमिका होती. मात्र, अजित दादांची कॉन्ट्रॅक्ट संदर्भात वेगळी भूमिका होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नसल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. तटकरे आरोरांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी चर्चेला गेल्याचा अंदाज असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व गोष्टींची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दादांना का उशीर झाला? हे मी बोलून दाखवले, दादा गाडीने गेले असते तरी दुर्घटना घडली नसती, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार हे नवे राहुल गांधी बनलेत की ते संजय राऊत इन मेकिंग बनत चाललेत??, असा सवाल विचारायची वेळ त्यांच्याच गेल्या तीन दिवसांमधल्या वक्तव्यांमधून पुढे आली.
X (ट्विटर), यू-ट्यूब, स्नॅपचॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जाणाऱ्या AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कंटेंटवर लेबल लावावे लागेल. यासोबतच डीपफेक व्हिडिओ-फोटो देखील 3 तासांत काढून टाकावे लागतील.
अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.
जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या अपघाताबाबत नवनवीन माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “विमानात नक्की काय घडलं? कशा प्रकारे ही दुर्घटना झाली? याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून, ९ फेब्रुवारीनंतर मी यावर स्पष्टपणे भाष्य करणार आहे,” असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना खडेबोल सुनावलेत. एवढी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी? असा खडा सवाल कोर्टाने या प्रकरणी रोहित पवार यांना केला आहे. कोर्टाच्या या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी यासंबंधीची आपली याचिका मागे घेतली आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या सगळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी अजितदादांचा तेरावा होईपर्यंत कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रोहित पवारांना मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. रोहित पवारांनी मतदार यादी मध्ये अचानक वाढ केली. ती वाढ करताना त्या यादीत स्वतःचे सगळे नातेवाईक घुसविले, असा आरोप करणारी याचिका क्रिकेटपटू केदार जाधव यांनी हायकोर्टात केली होती. हायकोर्टाने सकृत दर्शनी त्यांचे म्हणणे मान्य केले असून निवडणुकीला स्थगिती दिली. मतदार यादीवर घेतलेल्या आक्षेपांवर पारदर्शक पद्धतीने समाधानकारक तोडगा काढत नाही तोपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, असा स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिला.
शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले.
जामखेडच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलताना केले. त्याचवेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे आली.
मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.
राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदरील विधान केले. तसेच लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.
विशेष प्रतिनिधी पुणे : Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला “गोट्या खेळत होतास का? खिशातून […]