Maharashtra : राज्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ; फडणवीस सरकारकडून मदत जाहीर
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा देखील पुराच्या विळख्यात अडकला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच शेतांमध्ये पुराचे पाणी गेल्याने पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. अशात आता सरकारने पुढाकार घेतला असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ देण्यात येत आहे.