• Download App
    पाण्याची बाटली ३ हजारांची तर ताटभर भात ७ हजार रुपयांना, अफगाणिस्तानातील चित्र; तालिबानमुळे विमानतळावर नागरिकांचे हाल । The cost of a bottle of water outside the Kabul airport is up to 40 US Dollars i.e. about 3 thousand rupees, whereas for a plate of rice people have to pay 100 US Dollars i.e. over seven thousand rupees.

    पाण्याची बाटली ३ हजारांची तर ताटभर भात ७ हजार रुपयांना, अफगाणिस्तानातील चित्र; तालिबानमुळे विमानतळावर नागरिकांचे हाल

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तान तालिबानने बळकावल्यानंतर तेथील अनेक नागरिकांनी पलायन करण्यासाठी काबूल विमानतळावर आणि परिसरात धाव घेतली. अनेकजण विमानांच्या प्रतीक्षेत असून त्यांनी तेथे ठाण मांडले आहे. तेथे वेक पाण्याची बाटली ३ हजार रुपयांना तर ताटलीभर भात खरेदी करण्यासाठी ७ हजार रुपये मोजावे लागत आहेत. The cost of a bottle of water outside the Kabul airport is up to 40 US Dollars i.e. about 3 thousand rupees, whereas for a plate of rice people have to pay 100 US Dollars i.e. over seven thousand rupees.



    काबुल विमानतळावरील घडामोडीचा आढावा झी न्यूजने घेतला तेव्हा ही बाब उघड झाली. सध्ये तेथे हजारो लोक आहेत. काल संध्याकाळपर्यंत ८२ हजारांवर लोकांना हलविले आहे. त्यात व्हिसा असलेले परदेशी नागरिक मोठ्या संख्येने होते. विमानतळ खचाखच भरले आहे. तेथे १० मिनिटे थांबणे अवघड असताना लोक अनेक दिवसांपासून आपला विमानात चढण्याचा नंबर येण्यासाठी उभे आहेत. अन्न आणि पाणी खरेदीसाठी अनेकांकडे पैसे नाहीत. दुसरीकडे विमानतळाबाहेरचे अन्न, पाणी खरेदी करणे आवाक्याबाहेर झाले आहे कारण त्याची किंमत भडकली आहे. किंमत ऐकून डोळे फिरतील. कारण विमानतळाबाहेर पाण्याची एक बाटली ३ हजाराना तर ताटलीभर भात हा ७ हजार रुपयांना मिळत आहे. त्यामुळे नागरिक महागाईला आता कंटाळले आहेत.

    अमेरिका- तालिबान संघर्षात प्रवासी भरडणार ?

    विमानतळ आणि बाहेर तोबा गर्दी आहे. ५० हजारांवर नागरिक देशाबाहेर पाडण्याच्या तयार आहेत. पण, अनेकांकडे पासपोर्ट, व्हिसा समस्या आहेत. दुसरीकडे ३१ ऑगस्ट ही तारीख जवळ येत आहे. अमेरिकने ३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घेणार असल्याचे जाहिर केले होते. पण आता या मुदतीत सैन्य माघारी घेणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे तालिबानी अफगाणिस्तान अमेरिका मुक्त कारण्यासाठी आडून बसला आहे. त्यामुळे अमेरिकन सैनिक आणि तालिबानी यांच्यात संघर्ष उडाला तर त्यात विमानतळ आणि विमानतळावरील नागरिक प्रथम भरडले जाणार आहेत.

    The cost of a bottle of water outside the Kabul airport is up to 40 US Dollars i.e. about 3 thousand rupees, whereas for a plate of rice people have to pay 100 US Dollars i.e. over seven thousand rupees.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’