prakash ambedkar : प्रामाणिकपणा असेल तरच आंदोलन यशस्वी होते, प्रकाश आंबेडकरांनी घेतला ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा समाचार
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राज्यातील ओबीसी नेत्यांच्या धरसोड वृत्तीचा समाचार घेतला आहे. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्यात प्रामाणिकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर माझी भूमिका धरसोड वृत्तीची आहे का? हा प्रश्न ओबीसीच्या सर्वच नेत्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे ते म्हणालेत.