Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसले भारताच्या सशस्त्र दलांचे शक्तिप्रदर्शन
७६ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर भारतीय सैन्याची ताकद आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. जगातील एकमेव सक्रिय घोडेस्वार रेजिमेंट, ६१ व्या घोडदळाने परेडची सुरुवात केली. त्याचे नेतृत्व लेफ्टनंट अहान कुमार यांनी केले.