Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणाले- नागपूर घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यामुळे हिंसाचार घडला
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील राजकारण तापले असून मंगळवारी रात्री नागपूर शहरात हिंसाचार उसळला होता. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे