Ramdas Kadam’ : सहा नव्हे सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार; रामदास कदम यांच्या विधानाने खळबळ, आमदारही फुटीच्या मार्गावर असल्याचा केला दावा
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे सहा खासदार आज अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार सध्या मुंबईत दाखल झाले असून ते शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र या राजकीय घडामोडींदरम्यान शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक खुलासा केला असून, त्यांच्या माहितीनुसार या प्रवेशासाठी केवळ सहा नव्हे, तर तब्बल सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.